AASSIGNMENT NO.9

 लॉकडाउनच्या काळात मला हे लक्षात आलं की जरी शाळा बंद असल्या तरी आपण विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये खंड पाडू शकत नाही तेव्हाच शक्य आहे जर आपल्या सोबत आताचे युगातील तंत्रज्ञान सोबत असतील तर या माध्यमातून आपण संपर्क साधू शकतो आणि त्यांना आपल्या विषयाबद्दल समजून सांगू शकतो  गूगल मीटरद्वारे विद्यार्थ्यांना शिकवलं त्यांना दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या हालचाल विचारले आणि अभ्यासाबद्दल देखील विचारले. मला हे कळालं की फक्त चौक आणि बोर्ड शिकवण्याचा माध्यम नसून तर तंत्रज्ञान सुद्धा एक माध्यम असू शकतो या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिकवण्याचा प्रयत्न केला. विविध ॲप गूगल मीट आहे, झूम मीटिंग आहेत व, गुगल, युट्युब सर्वांच्या माध्यमातून मला नवीन गोष्टी शिकण्यास मिळाले की शिक्षण आपण कसे उपलब्ध करून देऊ शकतो. वेगवेगळ्या ज्ञानवंत यांचे व्हिडिओ पाहून युट्युब वर माझ्या ज्ञानामध्ये जास्त अधिक आणि अधिक भर पडली आणि माझ्या विषयांमध्ये अजून कशी प्रगती करू शकते याचा मी अभ्यास केला. दुसरं माध्यम म्हणजे पावर पॉइंट त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची स्लाइड तयार करून त्यामध्ये चित्र दाखवून लेकरांना आपण त्या माध्यमातून देखील शिकू शकतो आणि त्यांना ते बनवलेले पीपीटी चे पीडीएफ सेंड करून त्यांना अभ्यासामध्ये मदत करू शकतो. व्हाट्सअप द्वारे आपण त्यांना  बनवलेल्या नोट असे सुद्धा फोटो पाठवू शकतो. शोट क्लीप बनवून ऑडिओ व्हिडिओ चे व्हाट्सअप वर त्यांना सेंड करून त्यांना पाठा बद्दल इम्पॉर्टंट गोष्टी सांगू 
शकतो. मी माझ्या विषयाबद्दल अधिक गुगल वरून माहिती काढली आणि त्याच्यावर मी अजून जास्त ज्ञान मिळवले. तसेच मी या गोष्टीचा देखील अभ्यास केला की माझा विषय मी अजून कसा रुचकर बनवू शकते.